कोरोना व्हायरस. ??????

हा विषाणूंचा एक गट आहे. या व्हायरसमुळे सस्तन प्राण्यांना आणि पक्ष्यांना विविध रोग होतात. यांत गायींना व डुकरांना होणाऱ्या अतिसाराचा आणि कोंबड्यांना होणाऱ्या श्वसन रोगाचा समावेश आहे. या विषाणूचा प्रसार मानवांमध्ये श्वसन संसर्गाने होतो. हे संसर्ग बऱ्याचदा सौम्य, परंतु संभाव्य प्राणघातक असतात. कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करणारी लस किंवा रोग झाल्यास घ्यायची अँटिव्हायरल औषधे अजूनतरी (२०२० साल) उपलब्ध नाहीत.

Generic placeholder image

कोरोना विषाणूमुळे होणारा आजार पसरतो कसा.

हा आजार शिंकण्या-खेकल्यातून जे थेंब बाहेर पडतात त्यातून पसरतो. याशिवाय शिंकण्या-खोकल्यातून उडालेले थेंब आजूबाजूला पृष्ठभागावर पडतात. अशा पृष्ठभागाला स्पर्श केल्याने हे थेंब हाताला चिकटतात.हाताने वारंवार चेहरा,डोळे,नाक चोळण्याच्या सवयीमुळे देखील हा आजार पसरु शकतो. कोरोना विषाणू आजारावर कोणतेही औषध अथवा लस उपलब्ध नाही. रुग्णास त्याच्या लक्षणानुसार उपचार केले जातात.

Generic placeholder image

कोरोना विषाणू आजाराची लक्षणे

कोरोना विषाणू आजाराची लक्षणे ही मुख्यत्वे श्वसनसंस्थेशी निगडीत असतात ती सर्वसाधारणपणे इन्फ्लुएन्झा आजारासारखीच असतात. सर्दी, खोकला,श्वास घ्यायला त्रास होणे, ताप, न्युमोनिया, काहीवेळा मुत्रपिंड निकामी होणे अशी लक्षणे आढळतात.

Generic placeholder image

कोरोना आजार होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी.

1) श्वसनसंस्थेचे विकार असलेल्या व्याक्तींशी संपर्क ठेवताना संसर्ग न ळोण्याची काळजी घेणे. 2) वारंवार हात धुणे 3) शिंकताना, खोकताना नाकातोंडावर रुमाल अथवा टिश्यु पेपर धरणे. 4) अर्धवट शिजलेले, कच्चे मास खाऊ नये. 5) फळे, भाज्या न धुता खाऊ नयेत.

Generic placeholder image

आयुष मंत्रालयाचे प्रतिकारशक्ती वाढविण्याचे उपाय

अधिक माहिती

Generic placeholder image